Lokmat News | ह्यालाच म्हणतात का विकास ? अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने आईने केला मृतदेह दान | News

2021-09-13 0

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात एक हृदय द्रावक घटना घडली आहे. एका महिलेचा मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला जगदलपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.पण तरुण मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आईकडे पैसे नव्हते.पैसे नसल्याने गावी जाणं शक्य नाही, तसेच अंत्यसंस्कारही करता येणार नसल्याचे पाहून बस्तर मधील मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने मुलाच्या आईला मुलाचा मृतदेह दान करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मृतदेह दान केला. बस्तरमध्ये पहिल्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये देहदान झाले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires